लोकवर्गणीच्या माध्यमातून पोहचली शिक्षणाची ज्ञानगंगा |BULDHANA|SAKAL|SAKAL MEDIA GROUP|

2021-04-28 556

एकीकडॆ कोविड19 मुळे जग थांबलं असतांना सर्वसामान्य माणूस हा पोटाची खळगी कशी भरल्या जाईल याच विवंचनेत होता. लॉकडाऊनच्या काळात काय करावं हे सुद्धा कुणालाच काही कळत न्हवत, मात्र दुसरीकडे याच लॉकडाऊनच्या काळात शहर आणि गावच्या गावं ओसाड होऊन थांबली होती. एका गावात मात्र शिक्षणाचं महत्त्व आणि गोडी वाढावी यासाठी गावकरी आणि गावातील तरुण अहोरात्र झटत होते. सोशल डिस्टन्ससिंगचा वापर करत लोकवर्गणीतून बोलक्या भिंतीचे काम यागावातील तरुणांनी हाती घेतलं आणि बघता बघता शिक्षणासाठी उभारलेली ही लोकचळवळ उदयास आली. शिक्षणाची ज्ञानगंगा घरा घरात पोहचवणाऱ्या आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी आहे.
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं हे छोटसं गाव. या छोट्याश्या जिल्हापरिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी याच छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग, म्हणून पोहचलेल्या सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यसमोर शिक्षण क्षेत्रातील एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नव्या पिढी समोर शिक्षणात रुची निर्माण व्हावी तसेच शाळा सक्षमीकरण व्हावे यासाठी या बोलक्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत.जिल्हापरिषदची शाळा म्हंटली म्हणजे निधी कोण देणार? कधी मंजूर होणार? यासर्व गोष्टी मध्ये न पडता गावकऱ्यांनी आप आपल्या परीने लोकवर्गणीच्या माध्यमातून शिक्षणाचं हे नंदनवन उभं केलंय. या अभिनव उपक्रमनिमित्त तालसीवनी गावात दीपोत्सव ज्ञाननाचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी सिद्धार्थ खरात, जेष्ठ पत्रकार राहुल पहुरकर , सरपंच आकाश खरात उपसरपंच कैलास भूमकर, माजीसरपंच राजूभाऊ शंकर, सुशील शिंदे, नंदू देशमुख , मुख्याध्यापक राऊत सर, विठ्ठल चव्हाण. जितू बांबरगे, दिलीप खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संचालन माधव खरात तर आभार मुख्याध्यापक तस्लिम शेख यांनी मानले.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires